गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पहिले पाणी आणि खत व्यवस्थापन
गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पहिले पाणी आणि खत व्यवस्थापन
Read More
जानेवारी २०२६ केवळ थंडी! पण फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळीचे तीव्र संकेत; महाराष्ट्रात थंडीत चढ-उतार
जानेवारी २०२६ केवळ थंडी! पण फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळीचे तीव्र संकेत; महाराष्ट्रात थंडीत चढ-उतार
Read More
हिवाळी अधिवेशन २०२५ चा समारोप: शेतकऱ्यांसाठी ‘कर्जमाफी’ची मोठी घोषणा; पण अनुदानाचे प्रश्न मात्र गुलदस्त्यात
हिवाळी अधिवेशन २०२५ चा समारोप: शेतकऱ्यांसाठी ‘कर्जमाफी’ची मोठी घोषणा; पण अनुदानाचे प्रश्न मात्र गुलदस्त्यात
Read More
New Aadhaar App ; आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा प्रोसेस
New Aadhaar App ; आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा प्रोसेस
Read More
थंडीची लाट नाहीशी होणार! १५ ते २१ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज
थंडीची लाट नाहीशी होणार! १५ ते २१ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज
Read More

कांदा बाजारात ‘पोळ’ची हवा! भाव ४६०० पार, पण सर्वसामान्य कांदा मातीमोल, शेतकरी हवालदिल!

राज्यातील कांदा बाजारात आज दरांचे दोन विभिन्न जग पाहायला मिळाले. एकीकडे पिंपळगाव बसवंत येथे ‘पोळ’ कांद्याला तब्बल ४६०१ रुपयांचा विक्रमी दर मिळाल्याने काही शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला, तर दुसरीकडे सर्वसामान्य उन्हाळी कांदा अक्षरशः मातीमोल भावाने विकला गेला, ज्यामुळे बहुतांश शेतकरी देशोधडीला लागले आहेत. पिंपळगाव बसवंत येथे ‘पोळ’ कांद्याचा सर्वसाधारण दर २३०० रुपये होता, तर देवळा येथे लाल कांद्याला १७५० रुपयांचा भाव मिळाला.

ADS किंमत पहा ×

मात्र, हे चित्र सर्वत्र नाही. कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये प्रचंड आवक झाल्याने सर्वसाधारण दर केवळ १००० ते १०५० रुपयांवरच स्थिरावला आहे. मालेगाव-मुंगसे आणि कळवण येथे तर दर ११७० ते १२५० रुपयांपर्यंत खाली आल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. ‘पोळ’ कांद्याच्या उच्चांकी दरांच्या बातम्या येत असल्या तरी, सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकरी मात्र आवकेच्या दबावाखाली भरडला जात आहे, हेच बाजाराचे कटू सत्य आहे.

Leave a Comment