गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पहिले पाणी आणि खत व्यवस्थापन
गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पहिले पाणी आणि खत व्यवस्थापन
Read More
जानेवारी २०२६ केवळ थंडी! पण फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळीचे तीव्र संकेत; महाराष्ट्रात थंडीत चढ-उतार
जानेवारी २०२६ केवळ थंडी! पण फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळीचे तीव्र संकेत; महाराष्ट्रात थंडीत चढ-उतार
Read More
हिवाळी अधिवेशन २०२५ चा समारोप: शेतकऱ्यांसाठी ‘कर्जमाफी’ची मोठी घोषणा; पण अनुदानाचे प्रश्न मात्र गुलदस्त्यात
हिवाळी अधिवेशन २०२५ चा समारोप: शेतकऱ्यांसाठी ‘कर्जमाफी’ची मोठी घोषणा; पण अनुदानाचे प्रश्न मात्र गुलदस्त्यात
Read More
New Aadhaar App ; आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा प्रोसेस
New Aadhaar App ; आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा प्रोसेस
Read More
थंडीची लाट नाहीशी होणार! १५ ते २१ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज
थंडीची लाट नाहीशी होणार! १५ ते २१ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज
Read More

गहू पेरणीचे सुधारित तंत्रज्ञान! ‘या’ तारखेपर्यंत करा पेरणी; उत्पादन वाढवण्यासाठी गजानन जाधव यांचे महत्त्वाचे सल्ले

उशिरा पेरणी केल्यास प्रति एकर अडीच क्विंटलने घट; बीज प्रक्रिया, खत व्यवस्थापन आणि पाणी नियोजनावर लक्ष द्या.

उशिरा पेरणीची योग्य वेळ आणि उत्पादनावरील परिणाम

गव्हाच्या पेरणीची योग्य वेळ साधारणतः ३० नोव्हेंबरपर्यंत असते, मात्र यावर्षी लांबलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पेरणी वेळेवर झालेली नाही. ज्या शेतकऱ्यांना अजून गहू पेरणी करायची आहे, त्यांच्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत उशिरा पेरणी करण्याची शिफारस गजानन जाधव यांनी केली आहे. मात्र, पेरणीस जेवढा उशीर होईल, तेवढे उत्पादनात घट येते हे लक्षात घ्यावे. जाधव यांच्या माहितीनुसार, ३० नोव्हेंबरनंतर पेरणीच्या प्रत्येक पंधरवड्यात उत्पादनामध्ये प्रति एकर अडीच क्विंटलने घट होण्याची शक्यता असते. त्यामुळे १५ डिसेंबरनंतर गव्हाऐवजी दुसरे पर्यायी पीक निवडणे अधिक फायदेशीर ठरू शकते.

उशिरा पेरणी करताना घ्यायची काळजी

उशिरा पेरणी करताना जमिनीत पुरेशी ओल असावी आणि पेरणी शक्यतो उत्तर-दक्षिण करावी, जेणेकरून पिकाला जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळेल. उशिरा पेरणीसाठी दोन ओळींमधील अंतर कमी करून बियाण्याचे प्रमाण (सीड रेट) वाढवावे लागते. तसेच, पेरणी ५ ते ६ सेंटीमीटर खोलीवर करावी, जेणेकरून उगवण चांगली होईल.

पाणी व्यवस्थापनाचे अचूक नियोजन

गव्हासाठी पाण्याचे योग्य नियोजन महत्त्वाचे आहे. सर्वसाधारणपणे दर १८ ते २१ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. गव्हाच्या संवेदनशील अवस्थांमध्ये पाणी देणे आवश्यक असते, ज्यात मुकुटमळे फुटण्याची अवस्था (१८-२१ दिवस), कांडी धरण्याची अवस्था (४०-४५ दिवस), फुलोरा आणि दाणे भरण्याची अवस्था (६०-८५ दिवस) यांचा समावेश होतो. पाण्याची उपलब्धता कमी असल्यास ४० दिवसांनी एकच पाणी द्यावे किंवा दोन पाणी देणे शक्य असल्यास २० आणि ६० दिवसांनी पाळ्या द्याव्यात.

उत्पादन वाढवण्यासाठी बीज प्रक्रिया आणि खत व्यवस्थापन

जाधव यांच्या मते, उत्पादन वाढवण्यासाठी बीज प्रक्रिया, खत व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

  • बीज प्रक्रिया: पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्याला ‘रिहांश’ (कीटकनाशक), ‘झोरमेट’ (बुरशीनाशक) आणि ‘लिओसन’ (वाढ रोधक) यांचा वापर करून बीज प्रक्रिया करावी. यामुळे खोडअळी, बियाण्याद्वारे पसरणारे रोग यापासून संरक्षण मिळते आणि फुटव्यांची संख्या वाढून गहू लोळत नाही.

  • खत व्यवस्थापन: पेरणीसोबत डीएपी/१०:२६:२६ आणि पोटॅश द्यावे. युरियाचे प्रमाण एकाच वेळी न देता, २०-२२ दिवसांनी अर्धी बॅग आणि ४०-४५ दिवसांनी राहिलेली अर्धी बॅग, अशा दोन भागांत विभागून दिल्यास उत्पादनात २०% पर्यंत वाढ होते, अशी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली आहे.

  • कीड व तण नियंत्रण: रुंद पानांच्या तणांवर जमिनीत ओलावा असताना ‘अलग्रीप’ (८ ग्रॅम प्रति एकर) या तणनाशकाची फवारणी २०-२५ दिवसांच्या आत करणे प्रभावी ठरते, तर पोंगेमर आणि खोडअळीवर ‘रेज’ हे कीटकनाशक उपयुक्त आहे.

Leave a Comment