पंतप्रधान आवास योजना ग्रामीण (PMAY-G) यादी पाहण्यासाठी सोपी प्रक्रिया; कोणाला किती हप्ता मिळाला, तेही पाहा.
नवीन यादी पाहण्यासाठी आवश्यक पोर्टल
तुमच्या ग्रामपंचायतीमधील घरकुल योजनेची यादी मोबाईलवर पाहण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) च्या अधिकृत पोर्टलवर (pmayg.nic.in) भेट देणे आवश्यक आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गावातील लाभार्थ्यांची नावे, त्यांना मिळालेल्या हप्त्यांची माहिती आणि किती रक्कम शिल्लक आहे, याची सविस्तर माहिती घरबसल्या तपासू शकता.
ऑनलाईन यादी तपासण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया
पोर्टलवर आल्यानंतर, तुम्हाला ‘Awaassoft’ नावाचा पर्याय निवडून, त्यानंतर ‘रिपोर्ट’ (Report) या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ‘रिपोर्ट’मध्ये थोडं खाली स्क्रोल करून ‘सोशल ऑडिट रिपोर्ट’मध्ये असलेल्या ‘Beneficiary Details for Verification’ या पर्यायावर टच करून पुढील प्रक्रिया सुरू करावी.
जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायतीनुसार माहिती निवडा
यादी तपासण्यासाठी तुम्हाला काही फिल्टर माहिती भरावी लागेल. सर्वप्रथम, आपले राज्य, त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका (ब्लॉक) आणि शेवटी तुमची ग्रामपंचायत सिलेक्ट करावी लागते. त्यानंतर तुम्हाला ज्या वर्षाची यादी पाहायची आहे, ते वर्ष (उदा. २०२५-२०२६) निवडावे लागेल. यानंतर, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण किंवा तुम्ही अर्ज केलेल्या संबंधित आवास योजनेची निवड करावी. शेवटी, स्क्रीनवर दिसणाऱ्या कॅप्चा कोडचे (बेरीज/वजाबाकी) उत्तर भरून ‘सबमिट’ बटनावर क्लिक करावे.
यादी डाऊनलोड करून स्थिती तपासा
‘सबमिट’ केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये ही यादी PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठीचा पर्याय दिसेल. या डाऊनलोड केलेल्या यादीत लाभार्थ्यांचे नाव, त्यांना किती रुपयांचा हप्ता मिळाला आहे आणि पुढील हप्त्यासाठी किती रक्कम बाकी आहे, याची माहिती दिलेली असते. तुमचे नाव या घरकुल यादीमध्ये समाविष्ट आहे की नाही, हे तुम्ही या पद्धतीने तपासू शकता.