महाराष्ट्रासह मध्य भारतावर थंडीचा मोठा प्रभाव; काही ठिकाणी पारा ८°C पर्यंत घसरला, शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन.
उत्तरी भारतात डब्ल्यूडी सक्रिय आणि बर्फवृष्टी
सध्या वातावरणातील बदल आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स (डब्ल्यूडी) च्या वाढलेल्या प्रभावामुळे देशातील हवामान स्थिती बदलली आहे. उत्तरेकडील जम्मू-काश्मीर, लेह-लद्दाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या भागांमध्ये डब्ल्यूडी सक्रिय असल्याने मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. अफगाणिस्तानमार्गे वेस्टर्न डिस्टर्बन्स येत असल्याने, उत्तरेकडून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांचा थेट परिणाम मध्य भारतावर जाणवत आहे.
महाराष्ट्रासह मध्य भारतावर थंडीची लाट
भारतीय हवामान खात्याने (IMD) जाहीर केल्यानुसार, सध्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट कायम आहे. या लाटेचा प्रभाव केवळ महाराष्ट्रावर नसून, ओरिसा, छत्तीसगड, तेलंगणा, उत्तर कर्नाटक, पश्चिम मध्य प्रदेश, दिल्ली आणि पंजाब या राज्यांमध्येही जाणवत आहे. डॉ. मच्छिंद्र बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी थंडीचा प्रभाव उत्तर किंवा पूर्व भारतापेक्षा मध्य भारतावर अधिक दिसत आहे, जो एक वातावरणीय बदल आहे.


















