गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पहिले पाणी आणि खत व्यवस्थापन
गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पहिले पाणी आणि खत व्यवस्थापन
Read More
जानेवारी २०२६ केवळ थंडी! पण फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळीचे तीव्र संकेत; महाराष्ट्रात थंडीत चढ-उतार
जानेवारी २०२६ केवळ थंडी! पण फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळीचे तीव्र संकेत; महाराष्ट्रात थंडीत चढ-उतार
Read More
हिवाळी अधिवेशन २०२५ चा समारोप: शेतकऱ्यांसाठी ‘कर्जमाफी’ची मोठी घोषणा; पण अनुदानाचे प्रश्न मात्र गुलदस्त्यात
हिवाळी अधिवेशन २०२५ चा समारोप: शेतकऱ्यांसाठी ‘कर्जमाफी’ची मोठी घोषणा; पण अनुदानाचे प्रश्न मात्र गुलदस्त्यात
Read More
New Aadhaar App ; आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा प्रोसेस
New Aadhaar App ; आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा प्रोसेस
Read More
थंडीची लाट नाहीशी होणार! १५ ते २१ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज
थंडीची लाट नाहीशी होणार! १५ ते २१ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज
Read More

लाडक्या बहिणींचे २१०० कधी करणार? विरोधी पक्षाने सरकारला धरलं धारेवर

२१०० रुपये कधी मिळणार, अपात्र लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करणार का? या प्रश्नांवरून विधानसभेत गदारोळ; उपमुख्यमंत्र्यांकडून योजनेचा ठाम बचाव.

विधानसभेत वाढीव रकमेच्या आश्वासनावरून वाद

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून विधानसभेत जोरदार चर्चा झाली. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या ₹२,१०० रुपये देण्याच्या घोषणेचा मुद्दा उपस्थित करून सरकारला धारेवर धरले. या योजनेसाठी ₹१५०० वरून रक्कम वाढवून ₹२,१०० कधी केली जाणार, असा स्पष्ट सवाल त्यांनी केला. निवडणुकीच्या तोंडावर घोषणा केली, परंतु अंमलबजावणी कधी करणार, याबद्दल स्पष्टता नसल्याचा आरोप विरोधकांनी केला.

ADS किंमत पहा ×

बोगस लाभार्थी आणि आर्थिक अनियमिततेवर प्रश्न

विरोधकांनी योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींवरून सरकारला घेरले. योजनेत सुमारे २६ लाख बोगस लाभार्थी आणि १५ हजार पुरुषांना महिलांच्या नावाने लाभ मिळाल्याचे गंभीर आरोप करत, या अनियमिततेमुळे झालेल्या ५१०० कोटींपेक्षा जास्त आर्थिक घोटाळ्यावर लक्ष केंद्रित केले. अपात्र लाभार्थ्यांवर आणि पडताळणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकार गुन्हे दाखल करणार आहे का, असा कडक प्रश्न विरोधी पक्षाने विचारला. तसेच, ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया उशिरा सुरू करण्यावरूनही आक्षेप घेण्यात आला. योजना जाहीर करतानाच हे नियम का लावले नाहीत, असा सवाल करत, सरकारला ही योजना जड जात असल्याने खर्च कमी करण्यासाठी आता हे ‘फिल्टरिंग’ सुरू केल्याचा आरोप विरोधकांनी केला.

Leave a Comment