नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? जाणून घ्या सविस्तर माहिती
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? जाणून घ्या सविस्तर माहिती
Read More
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवा जीआर : या महिलांना मोठी खुशखबर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवा जीआर : या महिलांना मोठी खुशखबर
Read More
घरकुल योजना: नवीन यादी कशी पहायची? मोबाईलवर घरबसल्या तपासा तुमचे नाव!
घरकुल योजना: नवीन यादी कशी पहायची? मोबाईलवर घरबसल्या तपासा तुमचे नाव!
Read More
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
Read More
अतिवृष्टी भरपाई मिळाली नाही? येथे करा तक्रार; टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधा, भरपाई मिळणारच!
अतिवृष्टी भरपाई मिळाली नाही? येथे करा तक्रार; टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधा, भरपाई मिळणारच!
Read More

राज्यातील थंडीचा जोर वाढणार: तापमानात मोठी घसरण, कडाक्याच्या थंडीचा अनुभव

उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे कोरडे हवामान; ग्रामीण भागात तापमान ६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता.

कडाक्याची थंडी आणि कोरडे हवामान

या आठवड्यात (९ ते १५ डिसेंबर २०२५ दरम्यान) राज्यातील हवामानामध्ये मोठा बदल होणार असून, उत्तरेकडून येत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. हवामान पूर्णपणे कोरडं राहील. या आठवड्यात राज्यातील बहुतांश भागांमध्ये कडाक्याची थंडी अनुभवायला मिळेल; मागील दोन-तीन वर्षांत इतकी तीव्र थंडी पडली नव्हती. या आठवड्यात कोणत्याही प्रकारच्या पावसाचा कसलाही अंदाज नाही. थंडी हळूहळू विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात वाढत जाईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

ADS किंमत पहा ×

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मोठी घसरण

राज्यातील अनेक प्रमुख भागांमध्ये तापमानात चांगली घट झाली असून, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढलेला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती आणि यवतमाळच्या भागात तापमानात चांगली घसरण झाली आहे. मराठवाड्यातही तापमान १० अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले आहे. अहिल्यानगर (अहमदनगर), जेऊर, करमाळा या भागांसह उत्तर महाराष्ट्रात तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षाही कमी झाले आहे.

Leave a Comment