गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पहिले पाणी आणि खत व्यवस्थापन
गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पहिले पाणी आणि खत व्यवस्थापन
Read More
जानेवारी २०२६ केवळ थंडी! पण फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळीचे तीव्र संकेत; महाराष्ट्रात थंडीत चढ-उतार
जानेवारी २०२६ केवळ थंडी! पण फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळीचे तीव्र संकेत; महाराष्ट्रात थंडीत चढ-उतार
Read More
हिवाळी अधिवेशन २०२५ चा समारोप: शेतकऱ्यांसाठी ‘कर्जमाफी’ची मोठी घोषणा; पण अनुदानाचे प्रश्न मात्र गुलदस्त्यात
हिवाळी अधिवेशन २०२५ चा समारोप: शेतकऱ्यांसाठी ‘कर्जमाफी’ची मोठी घोषणा; पण अनुदानाचे प्रश्न मात्र गुलदस्त्यात
Read More
New Aadhaar App ; आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा प्रोसेस
New Aadhaar App ; आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा प्रोसेस
Read More
थंडीची लाट नाहीशी होणार! १५ ते २१ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज
थंडीची लाट नाहीशी होणार! १५ ते २१ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज
Read More

कापूस बाजारात तेजी कायम, ८००० चा टप्पा पार! पण सर्वसामान्य शेतकऱ्याला दिलासा कधी?

राज्यातील कापूस बाजारात तेजीचा कल कायम असून, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आज अकोला आणि जालना या प्रमुख बाजारपेठांमध्ये कापसाच्या दराने पुन्हा एकदा ८००० रुपये प्रति क्विंटलचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. यासोबतच फुलंब्री येथे सर्वसाधारण दर ७८०० रुपयांवर पोहोचला, तर पुलगाव येथेही भाव ७४५० रुपयांवर गेल्याने बाजारात सकारात्मक वातावरण आहे. शेतकऱ्यांनी माल रोखून धरल्याने बाजारात दरांना चांगला आधार मिळत असल्याचे चित्र आहे.

ADS किंमत पहा ×

मात्र, ही तेजी सर्वत्र सारखी नाही, हे बाजाराचे वास्तव आहे. एकीकडे विदर्भातील काही बाजारपेठांमध्ये दरांनी मोठी उसळी घेतली असली तरी, अमरावती आणि काटोल सारख्या ठिकाणी सर्वसाधारण दर ७३०० रुपयांच्या घरातच आहेत. वाढलेला उत्पादन खर्च पाहता, सर्वसाधारण दर जोपर्यंत सातत्याने ८००० रुपयांच्या वर जात नाही, तोपर्यंत कापूस शेती परवडणारी नाही, अशी स्पष्ट भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी अजूनही मोठ्या दरवाढीच्या प्रतीक्षेत आहेत.

Leave a Comment