नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? जाणून घ्या सविस्तर माहिती
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? जाणून घ्या सविस्तर माहिती
Read More
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवा जीआर : या महिलांना मोठी खुशखबर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवा जीआर : या महिलांना मोठी खुशखबर
Read More
घरकुल योजना: नवीन यादी कशी पहायची? मोबाईलवर घरबसल्या तपासा तुमचे नाव!
घरकुल योजना: नवीन यादी कशी पहायची? मोबाईलवर घरबसल्या तपासा तुमचे नाव!
Read More
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
Read More
अतिवृष्टी भरपाई मिळाली नाही? येथे करा तक्रार; टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधा, भरपाई मिळणारच!
अतिवृष्टी भरपाई मिळाली नाही? येथे करा तक्रार; टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधा, भरपाई मिळणारच!
Read More

खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार!

मूग, उडीद, सोयाबीनसह अनेक पिकांचे काम अंतिम टप्प्यात; सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार.

पीकविमा वाटपाची तयारी अंतिम टप्प्यात

मागील खरीप हंगामात पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात जानेवारीपासून विमा संरक्षित रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे. पीकविमा योजनेअंतर्गत मागील खरीप हंगामातील पिकांचे कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन आणि कापूस या पिकांचा समावेश आहे. सध्या मूग आणि उडीद या पिकांचे कापणी प्रयोग संपून त्या पिकांच्या उत्पन्नाची माहिती शासनाला पाठविण्यात आली आहे. कांदा, तूर आणि मका या पिकांचे कापणी प्रयोग अंतिम टप्प्यात आहेत. बाकीच्या पिकांची माहिती डिसेंबरअखेर शासनाला पाठविली जाणार आहे.

ADS किंमत पहा ×

नुकसानीचे प्रमाण निश्चित करण्याची प्रक्रिया

पीक कापणी प्रयोगानंतर त्या पिकांच्या आलेल्या उत्पन्नाची माहिती शासनाला पाठविण्यात आली आहे. पीक कापणी प्रयोगानंतर आलेले उत्पन्न (उंबरठा उत्पन्न) व मागील सात वर्षांतील चांगल्या पाच वर्षांतील उत्पन्नाची तुलना केली जाते. त्यातून सध्याच्या अपेक्षित उत्पन्नाची तुलना होऊन उंबरठा उत्पन्नानुसार जोखमेची रक्कम निश्चित होते. या माहितीनंतर अपेक्षित उत्पन्न, उंबरठा उत्पन्न व मागील सात वर्षांतील उत्पन्नाची सरासरी यातून सध्याचे कमी आलेले उत्पन्न निश्चित होईल.

Leave a Comment